PVC Aadhaar Card Download: नमस्कार मित्रांनो तुम्हालाही कागदी आधार कार्ड वापरून कंटाळा आला आहे का? तसेच आधार कार्ड पावसात भिजणे खराब होणे परत त्याला लॅमिनेशन करणे, अशा बऱ्याच चिंता तुम्हाला सतावत आहे का?

तर मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे आता तुम्ही मिळवू शकता फक्त ₹ 50 रुपयात PVC Aadhaar Card तेही घर बसल्या जाणून घेऊया त्याची सोपी प्रक्रिया.
PVC Aadhaar Card apply online करून किंवा तुम्ही घरी म्हणजेच आधार कार्ड वरील पत्त्या वरती कसं मागवायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखा मध्ये मिळून जाईल तर हा पूर्ण लेख तुम्ही वाचावा आणि ही माहिती आवडल्यास तुम्ही तुमच्या जवळील नातेवाईकांशी ही शेअर करावी अशी विनंती.
Table of Contents
PVC Aadhaar Card घर पोहच कसे मिळवायचे?
- UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या. त्याची अधिकृत वेबसाईट आम्ही तुम्हाला देऊ. (अधिकृत वेबसाईट – https://uidai.gov.in
- यानंतर होम पेजवर My Aadhaar पर्याय निवडा.
- त्यानंतर Order PVC Aadhaar Card हा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.
- आपला आधार क्रमांक, VIrtual ID (वर्चुअल आयडी) , किंवा 28 अंकी EID तिथे नंबर टाका
- त्यानंतर तिथे एक कॅप्चा कोड (CAPTCHA CODE) असेल तो तुम्हाला तिथे दिलेल्या मोकळ्या जागी टाकायचा आहे.
- यानंतर सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करा.
- रजिस्टर मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून सबमिट करा (SUBMIT).
- ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला पन्नास रुपयाच्या पेमेंटच्या ऑप्शन्स विचारले जातील. ही पेमेंट आपण फोन पे किंवा गुगल पे म्हणजेच UPI याद्वारे देखील करू शकतो .
जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर?
- Send OTP पर्याय निवडा.
- तुमचा चालू मोबाईल नंबर टाका
- त्यानंतर Send OTP पर्याया वर क्लिक करा.
- मग तुम्ही ₹ 50 फी डिजिटल पेमेंट द्वारे भरून आपले PVC Aadhaar Card मिळवा.
हि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमचे PVC आधार कार्ड ची एक पावती आणि sms येईल ऑर्डर कन्फर्मेशनचा. हा SMS मिळाल्या नंतर तुम्हाला PVC Aadhaar card जवळ पास १५ ते ३० दिवसात तुमच्या आधार कार्ड वरील पत्त्यावर मिळून जाईल.
जर तुम्हाला तुमच्या PVC आधार कार्ड च्या ऑर्डरची स्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तेही करू शकता किंवा १९४७ ह्या हेल्पलाईन नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती मिळवू शकता.
अश्याच बर्याचश्या माहितीसाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आपल्या मित्रां सोबत हि माहिती नक्की शेअर करा