Majhi Ladki Bahin Yojana Online Apply: आपल्या महाराष्ट्र सरकारने आणली गरीब कुटुंबातील महिलांसाठी मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना”. या योजनेचा फायदा आपल्या महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील आर्थिक दुर्बळ असलेल्या महिलांना होणार असून सर्व महिलांना या योजनेमार्फत 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता आहे व त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी असण गरजेच आहे.
आज आपण या लेखाद्वारे या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व त्याचा अर्ज कसा भरावयाचा याची माहिती व काय आहे या योजनेचा लाभ घेण्याची पात्रता.
Table of Contents
काय आहे मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Yojana?
तर अजित पवार जे आपले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी यावेळेसच्या पावसाळी अधिवेशनात एक अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावाची एक आर्थिक दुर्बळ महिलांसाठी ज्यांचे वय 21 ते 65 वर्षे आहे व अल्प उत्पन्न गटातील महिलांना या योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाईल आणि त्यांची आर्थिक दुर्बलता कमी करण्याचा हा छोटा प्रयत्न असेल.
मागील आठवड्यामध्ये या योजनेत सरकारने बरेच सुधारणा सुद्धा केले आहे व या योजनेचा लाभ सर्वांना घेता यावा म्हणून सरकारने या योजनेची अर्ज ऑनलाईन घेण्यास सुरुवात केली आहे. खालील भागातील या लेखांमध्ये तुम्हाला या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याची माहिती सविस्तर दिली आहे तर शेवटपर्यंत पूर्ण वाचा.
काय आहे या मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Yojana Online Apply ची पात्रता ?
मुख्यमंत्री Majhi Ladki Bahin Yojana 2024: सर्वप्रथम आपण जाणून घेऊया या योजनेला लागू असणारी पात्रता काय आहे?
खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला समजेल तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही
- सर्वप्रथम अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी
- महिलेचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाहून जास्ती नसावे
- कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकर धारता नसावेत
- अर्जदार महिलाचे वय 21 ते 65 वर्षे असावे
- अर्जदार महिलांच्या नावाने कुठलेही बाकी आर्थिक मदत सरकार मार्फत मिळत असेल तर ते अपात्र ठरतील.
- कुटुंबातील सदस्य वर्तमान किंवा माजी संसद सदस्य किंवा विधानसभेचे सदस्य नसावेत
- अर्जदार महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे सरकारी कर्मचारी म्हणजेच नियमित किंवा कायम कर्मचारी नसावेत.
अर्ज भरण्यासाठी लागेल या कागदपत्रांची आवश्यकता –
आपण जाणून घेऊयात आता काय लागणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे. खालील दिलेली माहिती कागदपत्रांसाठी पूर्ण वाचा
- आधार कार्ड
- ईमेल आयडी
- मोबाईल नंबर: संपर्क आणि पडताळणीच्या उद्देशासाठी कार्यरत मोबाईल नंबर
- विज बिल: तुमच्या राहत्या घराचा पुरावा म्हणून मागील महिन्याचे विज बिल
- पत्त्याचा पुरावासाठी रेशन कार्ड मतदार ओळखपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जातीचे प्रमाणपत्र
काय काय असतील लाभ या योजनेमार्फत ?
- आर्थिक मदत दीड हजार रुपयांची होईल सरकारमार्फत
- त्यात सोबत तीन एलपीजी सिलेंडर मोफत दिले जातील दरवर्षी ज्यामुळे महिलांना गृहिणी गरजा पूर्ण करता येतील
- शिक्षण शुल्क माफी इतर मागासवर्गीय ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ इडब्लूएस गटांमधील मुलींसाठी महाविद्यालयीन शिक्षण शुल्क माफ केले जाईल. त्यामुळे साधारणतः दोन लाख मुलींना उच्च शिक्षण घेण्यास मदत होऊ शकते.
कसा करायचा Majhi Ladki Bahin Yojana Online Apply खालील माहिती नीट वाचा ?
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला आधी भेट द्या
- वेबसाईटवर अर्ज करा या बटणावर क्लिक करा
- नवीन पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कॅपच्या कोड पूर्ण व्यवस्थित भरा
- प्रोसेस बटणावर क्लिक करा
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अर्ज फॉर्म उघडेल
- अर्ज मध्ये विचारलेले सर्व माहिती पूर्ण पणे अचूक रित्या भरा
- आवश्यक कागदपत्रांची छायाचित्र दिलेल्या स्लोटमध्ये अपलोड करा.
- त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा म्हणजे तुमचा अर्ज पूर्ण होईल
- काही मिनिटांमध्ये तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुम्ही त्या अर्जाला सबमिट करा.
- सरकार तुमचा अर्ज स्वीकारल्यानंतर तुमच्या बँकेत दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातील.
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply मोबाईलद्वारे कसा भरायचा?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही मोबाईल द्वारे सुद्धा करू शकता आणि तो कसा करायचा याबद्दल खालील दिलेली माहिती संपूर्ण वाचा.
- सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर होऊन शक्ती नावाचे ॲप तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे.
- या ॲपमध्ये तुम्हाला तुमचा आधार लिंक मोबाइल नंबर वापरायचा आहे.
- ॲप मध्ये नंबर टाकून झाल्यावरती तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना चा ऑप्शन शोधायचा आहे.
- स्क्रीनवरील अर्ज सविस्तर भरा हा अर्ज मला न चुकता भरायचा आहे अर्ज मध्ये लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची संपूर्ण प्रक्रिया या लेखांमध्ये आहे.
- अर्ज भरून झाल्यानंतर भरलेल्या माहितीचे पुनरावलोकन करा व सबमिट बटनावरती क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा.
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply चे काही महत्त्वाच्या लिंक आम्ही तुम्हाला खाली देऊ इच्छितो.
नारीशक्ती दूध ॲप | येथे क्लिक करा |
माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF | येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविषयी सविस्तर माहिती मिळवा. | येथे क्लिक करा |