आता तुमचे Aadhaar Card Update करा मोफत ऑनलाईन – 14 डिसेंबर 2024 पर्यंत 

Aadhaar Card Update: जर तुमचा आधार कार्ड अपडेट नसेल तर येत्या 14 डिसेंबर 2024 पर्यंत ते ऑनलाइन मोफत अपडेट करता येणार आहे. 

युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) म्हणण्यानुसार जर तुम्ही गेल्या दहा वर्षात तुमचा आधार कार्डचा नाव, पत्ता किंवा जन्मतारीख अपडेट केली नसेल तर ते तुम्हाला मोफत अपडेट करता येणार आहे.

आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे का असते? आधार कार्ड हा बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. 

Aadhaar Card Update

Aadhaar Card Update

जर तुमचा आधार कार्ड दहा वर्षांपूर्वी जारी करण्यात आला असेल आणि अद्याप अपडेट केला नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो. आपली माहिती सुरक्षित आणि अचूक ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.

या आधी आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करण्याची तारीख 14 जून 2024 होती ती वाढवून १४ सप्टेंबर 2024 करण्यात आली‌ होती ‌तर आता ती 14 डिसेंबर 2024 करण्यात आली आहे तर त्यासाठी तुम्हाला ओळख आणि पत्त्याचा पुरावा लागणार आहे. 

यानंतर आधार कार्ड अपडेट केल्यास शुल्क भरावे लागणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *