Mumbai Local Viral Video 18 वर्षीय मुलगा लोकल मधून खाली पडला

Mumbai Local Viral Video: एका 18 वर्षीय मुलाचा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना खांब्याच्या धडकेने खाली पडल्याचा विडिओ व्हायरल झाला आहे. आपल्या मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये नेहमीच गर्दी असते व या गर्दीमुळे कित्येकदा धक्काबुक्की होते ही पण या वेळेस चक्क हा मुलगा ट्रेनच्या फुटबोर्डवर लटकला होता आणि याच दरम्यान काही लोक त्याचा व्हिडिओही काढत होते आणि या फुटबोर्ड वर तो एकटा नसून काही यात्रही होते. 

Table of Contents

Mumbai Local Viral Video

याच दरम्यान चालू ट्रेनमध्ये हा मुलगा एका खांबाच्या धडकेने खाली कोसळला व त्याला खूप सारी दुखापत झाल्या आहेत. असे म्हटले जात आहे की त्याचे काही हाडकं हि मोडली आहत, परंतु त्याची अवस्था आता स्थिर ही सांगितली जात आहे. 

दानिश नावाच्या या मुलाला लवकरात लवकर दवाखान्यात नेण्यात आले आणि त्याच्यावरती उपचारही सुरू झाले. त्याला काही फ्रॅक्चर्स आहेत आणि तो धोक्यातून बाहेर आहे. ही घटना ठाणे पोलिसांकडे गेली असून पुढची कार्यवाही ते करत आहेत. 

Mumbai Local Viral Video

तो मुलगा त्याच्या आई बहीण आणि लहान भावा सोबत राहतो व एका हाऊस डेकोरेशन कंपनीमध्ये मजदूरी करतो. ही घटना गुरुवारी झाली असून तो घरी जाण्यासाठी प्रवास करत होता. त्याच दरम्यान एका व्यक्तीने पुणे मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेस मधून प्रवास करत असताना हा Mumbai Local Viral Video रेकॉर्ड केला. 

असेच आपल्या मुंबईत खूप सारे कामगार, मजूर आणि नोकरदार व्यक्ती मुंबईच्या लोकलने गर्दीमधून प्रवास करत असतात जे की मध्यमवर्ग काम करून आपले पोट भरतात. तसेच या प्रवाशांना ही एक विनंती असेल की आपण आपला प्रवास काळजीपूर्वक करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *