115 महिन्यात पैसे दुप्पट! Post Office Scheme KVP नवीन योजना जाणून संपूर्ण माहिती

Post Office Scheme: सध्या बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण, आपल्या कष्टाने कमावलेले पैसे सुरक्षित राहावे यासाठी अनेक लोक सरकारी योजनांमध्येच पैसे गुंतवतात. पण सरकारी योजनांमध्ये परतावा कमी मिळतो, त्यामुळे अनेक जण विचार सुद्धा करतात की या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करावी की नाही. 

पण आता भारतीय पोस्ट कडे काही आकर्षक योजना आहेत ज्यात तुम्हाला ठराविक कालावधीत तुमची गुंतवणूक दुप्पट करण्यात मदत होईल. हो बरोबर दुप्पट कारण भारतीय पोस्टच्या वतीने या योजनेचे नाव किसान विकास पत्र (KVP) असे आहे तर या योजनेत तुम्हाला 7.5% दराने वार्षिक व्याज दिले जाईल. 

भारत सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेत एक रकमी रक्कम गुंतवावी लागते तर यावर तुम्हाला तिमाहीच्या आधारित व्याज मिळते. या योजनेत आपण निश्चित कालावधीत पैसे दुप्पट करू शकतो. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आपण पोस्ट ऑफिसद्वारे खाते उघडू शकतो.

या किसान विकास पत्र योजनेत कमीतकमी ₹ 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते व कमाल गुंतवणुकीची याला बिलकुल मर्यादा नाही. गेल्यावर्षी या किसान विकास पत्र योजनेचे दर 7.2% एप्रिल 2023 मध्ये होते, तर आता 7.5% म्हणजे 0.3 % वाढविले आहेत.

तसेच यापूर्वी किसान विकास पत्र या योजनेत पैसे दुप्पट होण्यास 120 महिने लागायचे परंतु आता फक्त 115 महिन्यात म्हणजेच 9 वर्षे आणि 7 महिन्यात पैसे दुप्पट होतात त्यामुळे थोडा लवकर फायदा होईल.

Post Office Scheme KVP
Post Office Scheme KVP

कोण करू शकतो Post Office Scheme KVP मध्ये गुंतवणूक?

  • किसान विकास पत्र या योजनेत गुंतवणूक करण्याचे वय कमीत कमी 18  वर्षे असणे आवश्यक आहे.
  • या योजनेत एकाला आणि संयुक्त खाते काढता येते.
  • तुमच्या लहान मुलांच्या नावाने पण या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करता येऊ शकते (मुलांचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त असावे).
  • अस्वस्थ मन असलेल्या किंवा अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालक.
  • हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट यांना पण गुंतवणूक करून फायदा मिळवता येतो.

काय आहेत Post Office Scheme KVP मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे?

  • तुम्ही संपूर्ण मुदतीच्या कालावधीत गुंतवलेल्या रकमेवर निश्चित व्याज.
  • या योजनेत ठराविक कार्यासाठी पैसे वाचविण्यासाठी मदत होते.
  • गुंतवलेली रक्कम 9.7 वर्षात दुप्पट होते व भविष्यात उच्च परतावा मिळण्यास मदत होते.
  • भारत सरकारचा पुढाकार असल्यामुळे शितकालावधीसाठी तुमचे पैसे वाचविण्यासाठी व ते वाढवण्यासाठी हा एक अत्यंत आणि सर्वात सुरक्षित पर्याय हि ठरतो.

 KVP साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे काय आहे?

  • फॉर्म A भारतीय पोस्ट ऑफिस शाखेत किंवा इतर विशिष्ट बँकांकडे रीतसर सबमिट करणे आवश्यक आहे.
  • फॉर्म A1, जर अर्ज एजंटद्वारे भरला गेला असेल.
  • आधार कार्ड , पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी  सारखी KYC कागदपत्रे ओळखपत्र म्हणून काम करतात.
  • अशा पद्धतीने किसान विकास पत्र योजना तुमच्या दीर्घकालीन बचतीसाठी सुरक्षित व योग्य पर्याय ठरेल!

मग मित्रांनो कसा वाटलं हा Post Office Scheme लेख तुम्ही आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करून संघू शकता आणि जर मराठी माहितीगारचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत हो शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *