Realme 12 Pro Plus Price in India 2024: यावर्षी 2024 मध्ये बरेचसे स्मार्ट-फोन भारतात लॉन्च झाले आहेत. त्यामध्ये रियल मी कंपनीचे नवीन नवीन स्मार्ट-फोन वेगवेगळ्या सिरीज मधले व्हेरीएंट्स सुद्धा भारतात लॉन्च झाले आहेत.
रियलमी कंपनी ही एक ओपो कंपनीची एक सब ब्रँड असून त्यांचे बरेचसे फीचर्स सोबत फोन लॉन्च होत असतात. त्यांचे फोन सामान्य वर्गासाठी जास्त उपयुक्त ठरतात ते कारण यांच्या किमतीमध्ये जास्त बदल नसतात व ते स्वस्त दरात व उत्तम सह फीचर्स मिळतात.
त्यापैकी Realme 12 Pro Plus हा एक फोन लवकरच भारतात लॉन्च होत आहे. या फोनमध्ये तुम्हाला बरेचसे प्रीमियम फीचर्स मिळणार आहेत. या फोनचा कॅमेरा हा सर्वात उत्तम आहे व 91Mobiles.com मार्फत ह्या फोनला बेस्ट कॅमेरा अवॉर्ड मिळाला आहे.
काय आहे या Realme 12 Pro Plus Price in India व किती पर्यंत मिळेल ह्याचे सर्व व्हेरीएंट्स मिळतील, ही माहिती आपण ह्या लेखामार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर संपूर्ण माहिती वाचावी अशी विनंती.
Table of Contents
काय आहे या Realme 12 Pro Plus Launch Date in India
रियल मी कंपनी ही एक चिनी उद्योजक कंपनी असून त्यांचे जास्तीत जास्त स्मार्टफोन हे भारतातच लॉन्च होतात त्यापैकीच हा Realme 12 Pro हा स्मार्टफोन 29 जुलै 2024 रोजी भारतात लॉन्च झाला आहे. आपण या फोनची फीचर्स समजून घेणार आहोत तर पूर्ण माहिती नक्की वाचा.

काय आहेत या Realme 12 Pro Plus फोनची Specifications & Features
जसं की तुम्ही ऐकलंच असेल की रियल मी 12 प्रो प्लस या फोनला बेस्ट कॅमेरा अवॉर्ड मिळाला आहे 91Mobiles.com तर्फे व यांचे कॅमेरा फीचर्स खूप ग्राहकांना उपयुक्त ठरतील असे म्हटले आहे तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया याचे कॅमेरा फीचर्स.
Category | Specifications |
Processor | Qualcomm Snapdragon 7s Gen24nm Chipset GPU Adreno 710Octa-core, Up to 2.4Ghz |
Camera | 64MP Periscope Portrait Camera50MP Sony IMX890 OIS Camera8MP Ultra-Wide CameraFront Camera – 32MP Sony Selfie Camera |
Ram | 8 GB / 12 GB |
Memory | 128 GB / 256 GB |
Charging Support | 67W SUPER VOOC Charger5000mAh Massive BatteryUSB Type-C Port |
Display | 120Hz Curved Vision Display |
Connectivity | 5G + 5G Dual Mode |
Audio | Super Linear Dual SpeakersSupports Dolby AtmosDual-mic Noise CancellationHi-Res Audio Certification |
Buttons & Ports | 2 Nano SIM Card SlotsType-C PortPower ButtonVolume Buttons |
Realme 12 Pro Plus – कॅमेरा फिचर्स
रियल मी 12 प्रो प्लस सोबत मिळत आहे पेरिस्कोप पोट्रेट कॅमेरा व सोनीचे IMX 890 OIS कॅमेरा सोबत. ह्या फोनचा मेन कॅमेरा असणार आहे 50 MP व 2X In-sensor Zoom आणि 1/1.56” Large sensor.
64 मेगापिक्सल पेरिस्कोपिक पोट्रेट कॅमेरा असणार आहे या फोनमध्ये. ज्यामुळे मिळेल 3x ऑप्टिकल झूम आणि 6x झूम सेन्सर त्यासोबतच नॉइज कंट्रोल, बोके पोर्ट्रेट्स आणि नॅचरल ब्लरिंग फीचर. इतकच नाही तर 120x सुपर झूम फिचर सुद्धा असणार आहे या रियल मी 12 प्रो प्लस मध्ये.

कोणते प्रोसेसर वापरले आहेत ह्या फोन मध्ये.
या फोनमध्ये तुम्हाला मिळू शकेल Qualcomm Snapdragon 7s Gen2 चे 4 nm Chipset तेही Octa-core, Up to 2.4Ghz आणि 5G कॉम्पॅटॅबिलिटी व Android 14 सह. त्यामुळे तुम्हाला कोणतेही गेम न अडथळा येता खेळता येऊ शकेल व या फोनमधील फीचर्स मुळे तुम्हाला मल्टी टास्किंग सुद्धा करता येऊ शकेल.
डिस्प्ले बद्दल जाणून घेऊया
ह्या फोन मध्ये तुम्हाला 120 hz चा रिफ्रेश रेट असलेला कर्व विजन OLED डिस्प्ले मिळणार आहे. इतकच नाही तर 2.32 nm ची अल्ट्रा न्यानो चीन मिळेल. Full HD plus डिस्प्ले टाईप असणार आहे या फोनमध्ये.
Ram आणि मेमोरी फिचर्स
Ram चे बोलायचे झाले तर तुम्हाला या फोनमध्ये 8 GB व 12 GB रॅम चे हे दोन वेरियंट्स दिसतील. त्यासोबतच आठ जीबी रॅम सोबत तुम्हाला 128 जीबी व 256 जीबी मेमरी चे दोन वेरेंट फक्त सबमरीन ब्लु कलर मध्ये उपलब्ध दिसतील आणि बाकी मध्ये फक्त १ वेरियंट्स मिळतील. तसेच 12 GB रॅम सोबत तुम्हाला 256 GB मेमरी चा वेरीएंट् उपलब्ध असेल. तसेच या फोनमध्ये एक्स्ट्रा 24 जीबी डायनॅमिक रॅम फीचर्स सुद्धा असणार आहे जो की ग्राहकांना खूप उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.
चार्जिंग व बॅटरी सेटअप
जसं की तुम्हाला माहितीच असेल रियल मी चे सुपर वुक चार्जर हे त्यांचे बेस्ट चार्जर म्हणून जाणले जाते. या फोनमध्ये तुम्हाला मिळेल 67 W सुपर वुक चार्जर व बॅटरी बॅकअप असेल जवळपास 5000 mAH जेणेकरून तुम्ही हा फोन पूर्ण दिवस वापरू शकाल. चार्जिंग मध्ये ह्या फोनमध्ये मिळेल तुम्हाला यूएसबी टाइप सी केबलचा चार्जिंग सपोर्ट.
काय आहे Realme 12 Pro Plus Price in India?
तर आपण आता जाणून घेऊया Realme 12 Pro Plus Price in India व किती मध्ये मिळतील या फोनचे वेगवेगळे वेरियंट्स. जसं की तुम्ही जाणता या फोनमध्ये रॅमचे दोन वेगवेगळे वेरियंट मिळणार आहेत. त्या पैकी 8GB Ram व 256 GB Memory वाल्या व्हेरियंटसची किंमत 28,999 रुपये. तसेच 12 GB रॅम व 256 GB मेमोरी ची किंमत असेल रुपये 30,999. ह्या फोनचे तीन कलर व्हेरियंटस मिळणार असून त्यामध्ये मिळतील Explorer Red, Submarine Blue आणि Navigator Beige.
तर तुम्हाला ही मराठी माहितीगारची सर्व रियल मी 12 प्रो प्लसची संपूर्ण माहिती ही नीट समजली असेल व आवडली असेल अशी आशा आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मित्रांना नक्की शेअर करा.
[…] तोट्यातून बाहेर येण्यासाठी हा OPPO Reno 12F 5G लवकरच भारतात लाँच होऊ […]
[…] संपूर्ण माहिती मिळवू शकता व आम्ही रियल मी 12 प्रो प्लस संपूर्ण माहिती सुद्धा दिली आहे तीही […]