Pune, Katraj Zoological Park’s Leopard Escapes | पुण्यातल्या कात्रज मधील राजीव गांधी झुलॉजिकल पार्क मधून पसार | 2024

Rajiv Gandhi Zoological Park Pune, Katraj:

पुण्यात स्थित असलेल्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील कात्रज  (Rajiv Gandhi Zoological Park Katraj) बिबट्या झाला आहे पिंजऱ्यातून पसार. ह्या बिबट्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून शोध सुरु असून, मात्र तो सापडला नसल्याने कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे.  

Pune, Katraj
Image Source – Google , Pexels.com

गज वाकवून पळल्याची माहिती

हा बिबट्या चक्क गज वाकवून पळल्याची माहिती समोर येत आहे. हा बिबट्या प्राणी संग्रहालयात आवारातच असल्याचं सांगितलं जात आहे व त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु असून त्याला मानवी वस्तीत शिरकाव न करून देण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी बरेच पिंजरे लावण्यात आले आहेत.  

हा पसार झालेला कर्नाटकातील हंपीतून बिबट्या आणला होता

पुण्यातल्या कात्रज मधील राजीव गांधी झुलॉजिकल पार्क मध्ये तीन माध्या आणि एक नर असल्याची माहिती आहे आणि त्यातील नर नसल्याची माहिती समोर अली आहे. असं सांगण्यात येतेकी हा नर कर्नाटकातील हंपी मधून आणला गेला होता आणि त्याला काही दिवसांपासून विलगीकरण ठेवले गेले होते. प्रथमदर्शी बिबट्या गज वाकवून पसार झाल्याची बातमी सोमवारी एका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. 

प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात आले आहे

प्राणीसंग्रहालय आज पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी सकाळपासून प्राणी संग्रहालयात शोधाशोध करण्यात आली, मात्र रात्री उशिरापर्यंत बिबट्या सापडला नाही. प्राणीसंग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी आहेत. तसेच प्राणीसंग्रहालयाच्या आजूबाजूला दाट सार्वजनिक वस्ती आहे. 

पुण्यातील कात्रज खळबळ उडाली आहे आणि हा बिबट्या १२ तासानंतर सापडल्याची बातमी येत आहे.

अश्याच पुण्यातील काही महत्वाच्या बातम्यां करीता आमच्या मराठी माहितीगारच्या व्हाट्सअप Community ला फॉलो करा. 

Nothing Phone 2a – Nothing मोबाईलने आणला नवीन Phone | 2024 मध्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *